कराड तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता केवळ २४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात आता केवळ २४ ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे कराड तालुक्याची कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे.

कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, वडगाव-उंब्रज येथील 49 वर्षीय महिला, कोळकी-फलटण येथील 45 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

या कोरोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. अरूण पाटील, डॉ. अनिल हुद्देदार, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

यात कराड तालुक्यातील एकूण 213 बाधित रुग्णां पैकी 186 रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले आहेत तर 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृष्णा हॉस्पिटल मधून आजपर्यंत 194 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 738 वर पोहोचली आहे. यातील आतापर्यंत 34 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 517 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment