कराड पालिका : ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सभा घेण्याची नगरसेवकांची मागणी, कर्मचाऱ्यांच्या घरांच्या विषयावरून वादावादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपरिषदेच्या विशेष सभेत पार्ले येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देणेबाबतच्या विषयावर किरकोळ वादावादी झाली. कर्मचाऱ्यांना जागा व घरे देण्याच्या विषयासह एकमताने सर्वच्या सर्व 10 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच यापुढील पालिकेच्या सभा या ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.

कराड नगरपरिषदेची विशेष सभा ऑनलाईन पार पडली. या सभेला नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, विरोधी पक्षनेते साैरभ पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विनायक पावसकर, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, फारूक पटवेगार, स्मिता हुलवान, अजंली कुंभार, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

साैरभ पाटील म्हणाले, पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत परंतु जीआरमध्ये घरांसाठी शासन पैसे देणार नाही. तेव्हा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार त्यांची यादी तयार करावी. कर्मचाऱ्यांना कशा पध्दतीने घरे मिळणार त्यासाठी काही गाईडलाईन यांचा विचार पहिल्यांदा करावा. बजेटमध्ये यासाठी काही तरतूद केली आहे का ? त्याचबरोबर याबाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज न होता, योग्य पध्दतीने कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत. परंतु त्यांची फसवणूक केली जावू नये.

पालिकेच्या विशेष सभेत 9 नंबरच्या विषयावरून काहीकाळ चांगलेच मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावेळी राजेंद्रसिंह यादव म्हणाले, पार्ले येथील जागेवर अतिक्रमण केलेले आहे, ते अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. आपली जागा बंदिस्त करावी.

Leave a Comment