कराड पंचायत समितीचे कर्मचारी आढळले कोरोना पोझिटीव्ह; तालुक्यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड पंचायत समितीचे कर्मचारी कोरोना बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने औषधाची फवारणी करून संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले आहे. शिवाय पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या लोकांनाही अटकाव करण्यात आला आहे.

महत्त्वाचे काम असेल तरच संबंधित कार्यालयात जावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महत्वाची कागदपत्रे प्रवेशद्वारातच जमा करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांनी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी, संबंधित कर्मचारी २९ जून रोजी कामानिमित्त पुणे येथे गेले होते. ३० रोजी ते परत आले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. ते एक दिवस पंचायत समितीत आले होते. नंतर रजा टाकून ते होम क्वारंटाईन झाले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

कार्यालयात असणाऱ्या एक महिला कर्मचारीही आजारी असल्यामुळे चार दिवसांपासून रजेवर आहेत. संबंधित कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले होते का याची चर्चा आता पंचायत समितीत सुरू झाली आहे. अधिकारी, कर्मचारी मात्र धास्तावले आहेत. खबरदारीच्या सर्व उपायोजना राबविण्यात येत आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment