कराड- पाटण शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनेश थोरात बिनविरोध

Karad- Patan Teachers Society
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी गुरुजन एकता पॅनलचे दिनेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनुसया पवार यांची बिनविरोध निवड झाली. गुरूजन एकता पॅनेलने सत्तांतर करत एकहाती विजय मिळवला होता. यामध्ये सर्वात जास्त 1 हजार 551 मतांनी विजयी झालेले दिनेश थोरात यांना चेअरमन पदाचा बहुमान मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवड पार पडली.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे, सातारा बॅंकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, गुरूजन एकता पॅनेलचे प्रमुख प्रदिप घाडगे, सातारा शिक्षक बॅंकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक आदी उपस्थित होते. सातारा जिल्हा शिक्षक समिती, शिक्षक संघ, शिक्षक भारती, जुनी पेन्शन संघटना, अखिल भारतीय दोंदे संघ, क्रास्टाईब शिक्षक संघटना यांचे पदाधिकारी या निवडीवेळी उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन दिनेश थोरात म्हणाले, शिक्षकांच्या बॅंक निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने मला चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली. आगामी काळात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सोसायटीचा आलेख वाढविण्यासाठी मी कार्यरत राहीन. कराड- पाटण शिक्षक सोसायटी राज्यात अव्वल ठरेल, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू.