कराड शहर पोलिसांकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त, 4 जण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी गाडी चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याचा तपास चालू असताना गोपनीय खबऱ्याकडून चोरी झालेल्या गाडीची माहीती मिळाली.

खबऱ्यांकडून माहीती मिळाल्यानंतर एकाला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. तसेच या चौघांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरीची गाडी विकण्यासाठी आरोपींच्याकडून शक्कल लढविली जात होती. गुन्ह्यातील आरोपी अनिकेत वाघमारे यांच्या मालकीच्या दुचाकीची नंबर प्लेट चोरीच्या दुचाकींना लावून त्या गाडीची कागदपत्रे गाडी खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला दाखवून विश्वास संपादन केला जात होता.

चारही आरोपी मित्र असून चैनीसाठी व दैनंदिन गरजांसाठी दुचाकी चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. चोरीच्या घटनेतील चारही आरोपी कराड तालुक्यातील उंब्रज या गावच्या परिसरातील आहेत. सपोनि राहूल वरूटे, अमित बाबर यांच्यासह कराड शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

You might also like