कराड तालुक्यातील 2 महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६२२ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून  मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 13 ग्रामीण रुग्णालय वाई येथील 80, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 45, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 व रायगाव येथील 41 असे 211 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधितांची संख्या अाता ६२२ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत २६ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत ३०३ जणांनी कोरोनावर मात केली असून २९३ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Leave a Comment