कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.
काल १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एक पुरु्ष रुग्णाचा (वय ३५ वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, सदर कोरोना बाधित रुग्ण मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळत आहे. गेले काही दिवस सदर व्यक्ती गावीच राहत होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्यांची प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता