कराड तालुक्यात पुन्हा १४ रुग्ण पोझिटिव्ह, दिवसभरात तब्बल २४ नवे कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड मधील कोविड बाधित म्हणून प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील १४ अनुमानित कोविड बाधित असल्याचे आताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९ वर पोहोचली आहे. यातील एकट्या कराड तालुक्यामध्ये तब्बल ५६ कोरोना बाधित रुग्ण असल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे.

कराड मध्ये आज सकाळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच एका गर्भवती महिलेसह तिचा एक निकटवर्तीयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा २ जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली. आता १ मे रोजी रात्री उशिराने पुन्हा कराड तालुक्यात कोरोनाचे नवे १४ रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात कराड मध्ये तब्ब्ल 24 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार कराड मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ५६ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी सदर माहिती दिली आहे.

आज सापडलेले रुग्ण हे प्रामुख्याने वनवसमाची, मलकापूर, आगाशिवनगर, कराड शहर या भागातील असल्याची चर्चा आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाकडून उद्या म्हणजे २ मे रोजी देण्यात येणार आहे.

आज सकाळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ६ आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने कराड वासियांसाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे. यामुळे कराड वासियांची झोप उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इत्तर महत्वाच्या बातम्या –

तळीरामांसाठी गुड न्यूज वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

केंद्राची मोठी घोषणा! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणार

खुशखबर! घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त

राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर

 

Leave a Comment