कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर, कोणत्या भागात किती रुग्ण पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना आता कराड तालुकाही कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २१ वर पोहोचली आहे. यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या कराड तालुक्यात असल्याने २३ एप्रिलपासून कराड, मलकापूरसह आसपासची ११ गावे पुर्णपणे सील करण्यात आली आहेत.

आज दिवसभरात कराड तालुक्यात ३ नवे कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आता सातारा जिल्ह्यात 16 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ही सगळी मिळून जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची गावनिहाय संख्या खालीलप्रमाणे –
१) तांबवे – १ रुग्ण (१८ एप्रिल रोजी डिस्चार्ज)
२) महारुगडेवाडी – १ ( ११ एप्रिल रोजी मयत)
३) महारुगडेवाडी – १ ( १५ एप्रिल रोजी अहवाल पोझिटिव्ह)
४) ओगलेवाडी – १
५) चरेगाव – १
६) बाबरमाची – १
७) वनवासमाची – १
८) आगाशिवनगर – १
९) वनवासमाची – १
१०) आगाशिवनगर – २ (२३ एप्रिल रोजी अहवाल पोझिटिव्ह)