कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोनाच्या धास्तीने सातारा जिल्ह्यातील नागरिाकंची झोप उडाली असतानाच बुधवारी रात्री आणखी 11 रूग्ण वाढल्याने काळजात धस्स झाले. रात्री 8 वाजता कराड तालुकयातील चार तर रात्री उशिरा जिल्ह्यातील आणखी 11 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. यामुळे बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 15 रुग्ण वाढले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील भरेवाडीतील दोन, म्हासोलीतील एक व इंदोलीतील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या धक्क्यातून तालुका सावरत असतानाच पुन्हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील 11 रूग्णांची भर पडली. माण तालुक्यातील परतवडी येथील 1, खटाव तालुक्यातील गादेवाडीतील 2 फलटण 1, खंडाळा 1 , कराड तालुक्यातील 4 व उर्वरित दोन अन्य तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परजिल्ह्यातून आलेले नागरिक तसेच बाधितांच्या निकट सहावासातील लोकामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.
आज नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पुण्या-मुंबईहून प्रवास करून आलेल्यांपैकी आहेत. कराड तालुक्यात वनवासमाची गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. आता म्हासोली या गावातही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज दिवसभरात कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील तब्बल २३ कोरोनाग्रस्तांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १८१ झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८० इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”