कराडात आज पुन्हा २ जण कोरोना पोझिटिव्ह, तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २५ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे. तसेच आज ९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून १३ जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 32, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 43, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 14 असे एकूण 98 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 9 असे एकूण 13 जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३५ वर पोहोचली आहे. शनिवारी कराड तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १२ जण कोरोना पॉसिटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाला आळा घालण्यात थोड्याफार प्रमाणात यश आले असल्याचे बोलले जात आहे. तसेच आज सातारा जिल्ह्यातील चौथ्या कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.