कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (आठवले गट) विविध मागण्यांसंदर्भात येथील तहसील कार्यालयासमोर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन केले. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, नोकरीतील पदोन्नती, आरक्षण कायम करवे, घरगुती वीज बिल करावे, बैलगाड्यांच्या शर्यती चालू कराव्यात, कराड शहरामध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभा करावा. खाजगी शाळांची फी माफ करावी, विविध मागण्यांसंदर्भात हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन आवळे, युवक जिल्हाध्यक्ष जयवंत वीरकायदे, कराड दक्षिण युवक अध्यक्ष अमोल कांबळे, कराड उत्तर युवक अध्यक्ष अभिराज वाघमारे, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, युथ जिल्हा उपाध्यक्ष गणेश गायकवाड, अभिजित भोसले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश गाडे, कराड तालुका अध्यक्ष युवराज काटरे, कराड दक्षिण कामगार आघाडीचे अध्यक्ष दिनकर जाधव यांची उपस्थिती होती.




