कराडचे युवा उद्योजक निशात महाडीक अपघातात जागीच ठार

कराड | येथील युवा उद्योजक निशात वसंतराव महाडीक (वय- 42) यांचे संगमनेर येथे अपघतात निधन झाले. शनिवारी रात्री उशिरा संगमनेरच्या सेवा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मागून कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. मोबाईलच्या विवो कंपनीत ते एरिया मॅनेजर म्हणून काम पाहत होते. शहरातील युवा उद्योजक म्हणून त्यांचा लाैकीक होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निशात महाडीक यांचे रेठरे बुद्रूक मुळगाव आहे. मात्र नोकरी व व्यवसायानिमित्त ते कराड शहरात स्थायिक आहेत. निशात महाडीक व्यवसायिक म्हणूनही शहरात परिचीत आहेत. विवो कंपनीच्या संगमनेर भागात त्यांनी काम घेतले होते. त्या भागातील एरिया मॅनेजर म्हणून ते काम होते. काल रात्री काम संपवून परतताना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या कारने जोराची धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या अपघाताचे वृत्त कऱ्हाड येथे समजताच त्यांचे आप्त स्वकीयांसह नातेवाईक व मित्रांनी संगमनेर येथे धाव घेतली.

निशांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार यांचे भाचे तर येथील व्यवसायिक नितीन महाडीक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. निशात यांच्या निधनाने रूक्मीणीनगर (कराड) परिसरात शोककळा पसरली होती. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मृतदेह येथे आणण्यात आला. त्यानंतर काही वेळाने मृतदेह त्यांच्या रेठरे बुद्रूक या मुळगावी नेण्यात आला. तेथे त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार झाले.

You might also like