कराडला विजय दिवस समारोह समितीमार्फत रणगाडा, विमान लोकार्पणाचा वर्धापनदिन साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

त्रीशक्ती फौंडेशन पुणे व विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाने भारतीय लष्करातील 1971 च्या युध्दातील मोठा पराक्रम करणारे एक लढाऊ विमान व रणगाडा कराड नगरपालिकेस प्रदान करण्यात आले. त्याच्या लोकार्पणाचा वर्धापनदिन सोमवारी साजरा करण्यात आला.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, सहसचीव विलासराव जाधव, संचालक विनायक विभूते, सलिम मुजावर, कॅप्टन बाबूराव कराळे, चंद्रकांत जाधव, दिलीप पाटील, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, प्रा. भगवान खोत, प्रा. महालिंग मुंढेकर, प्रा. रजनीश पिसे, रत्नाकर शानबाग, सुभेदार दिनकर मगरे, संतोष पवार, महेश भोसले, अरुणा जाधव, पोर्णिमा जाधव, प्राजक्ता पालकर, सोनाली डवरी आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा शिंदे यांनी युध्द स्मारकांचे महत्व सांगून ते नागरिकांना कायम प्रेरणादायी ठरतील असे गौरवोद्गार काढुन कर्नल संभाजीराव पाटील व विजय दिवस समारोह समितीचे आभार मानले. नगराध्यक्षांच्या हस्ते दुशेरेच्या सरपंच सुमन जाधव, चित्रपट अभिनेत्री सिध्दी ढापरे, मिनल ढापरे, मुख्याधिकारी डाके यांच्या हस्ते तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, शेणोलीचे सरपंच विक्रम कणसे, लेफ्टनंट हर्षवर्धन मोहिते यांचा सत्कार झाला. प्राचार्य कणसे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे संरक्षणमंत्री म्हणून दिलेल्या योगदानाची माहिती दिली. प्राचार्य घाटगे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव जाधव यांनी आभार मानले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment