कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काहिशा प्रमाणात आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण ७ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील ३५ वर्षांच्या तरुणाला आज डिसार्ज देण्यात आला. कृष्णा हाॅस्पिटल येथील सर्व स्टाफने या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.
संबंधीत रुग्णाने कोरोनाविरोधाच्या लढाईत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असुन तो प्लाझमा उपचारासाठी ब्लड डोनेट करणेस तयारी आहे. यावेळी सदर रुग्णाने कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डाॅक्टर आणि स्टाफचे आभार मानले.
दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांवर ट्रीटमेंट करताना कोणतीही कसूर न ठेवता त्यावर उपचार करून तो रुग्ण आता पूर्णपणे बरा होऊन घरी जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया कृष्णा वैद्यकिय अभिमत विदापिठाचे कुलपती डॉ सुरेश भोसले यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांपैकी आत्तापर्यंत दोन रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.