कराडच्या प्रेमलाताई कॉलेजने फसवणूक केल्याचा आरोप : नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

प्रेमलाताई इंटिग्रेटेड कॉलेज कराड येथे विद्यार्थ्यांनी गेल्या तीन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नर्सिंग कॉलेज कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्नता नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

प्रेमलाताई कॉलेजमध्ये जवळपास 30 ते 35 विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. नर्सिंग कॉलेजसाठी प्रवेश घेतलेल्या तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज वर गंभीर आरोप केले आहेत. तसेच नर्सिंगची पदवी मिळालेल्या काही विद्यार्थीनींनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. पदवी मिळालेल्या विद्यार्थिनींनी नोकरीसाठी गेलेल्या ठिकाणी ही पदवी बनावट असल्याचा सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच विद्यार्थी यांनी महाविद्यालयातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन तयार केले होते.

 

सदरील निवेदन प्रेमलाताई इंटिग्रेटेड कॉलेज यांच्या प्राचार्यांना देण्यासाठी गेले असता व्यवस्थापनातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या निवेदनात म्हटले आहे की नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले असूनही विद्यार्थ्यांना तासिका वेळेवर होत नाहीत. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात नर्सिंग मॅनेजमेंट डिपार्टमेंट उपलब्ध नाही. प्रात्यक्षिक दिले जात नाही, तसेच हॉस्पिटलला ड्युटी वर पाठवले जात नाही. प्राध्यापक वेळेवर प्रात्यक्षिक घेत नाहीत व तासिकाचे वेळापत्रक कॉलेजकडे नाही. परीक्षेचा कालावधी जवळ आला तरीही रजिस्ट्रेशनचा विषय अजूनही संपला नाही. निवेदनावर शहरमंत्री गणेश डुबल, जिल्हा संयोजक अजय मोहिते यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Comment