करण जोहरने असीम रियाझच्या चाहत्यांना दिला मोठा धक्का…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘बिग बॉस १३’ चा प्रसिद्ध स्पर्धक असीम रियाजने शोमध्ये असताना आपली फॅन फॉलोव्हिंग वाढवली होती. ‘बिग बॉस १३’चा पहिला उपविजेता असिम रियाजविषयी बातमी आली होती की तो कदाचित ‘स्टुडंट ऑफ द ईयर ३’ मध्ये असेल आणि करण जोहर त्याच्यासोबत किंग खानची मुलगी सुहाना खानला कास्ट करू शकतो. पण अलीकडेच या वृत्ताबद्दल करण जोहरने स्वत: असीम रियाझच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असलेल्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर ३’ बद्दल त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरूनही ट्विट केले आहे.

करण जोहरने आपल्या ट्विटद्वारे ‘स्टुडंट ऑफ द ईयर ३’ संबंधित सर्व बातम्या थांबवताना त्याने लिहिले की,” ‘स्टुडंट ऑफ द ईयर ३’ च्या विषयी जे काही बोलले जात आहे ते पूर्णपणे निराधार आहेत,कृपया हे थांबविण्याची सर्वांना मी विनंती करतो.” करण जोहरच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगते आहे, त्याचबरोबर लोकही यावर तीव्र मत व्यक्त करीत आहेत.करण जोहर हा बॉलिवूडमध्ये नवीन चेहरे लाँच करण्यासाठी ओळखला जातो. ‘स्टुडंट ऑफ दी इयर १’ च्या माध्यमातून सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी,तर ‘स्टुडंट ऑफ दी इयर २’ च्या माध्यमातून अभिनेत्री तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांना लॉन्च केले.

असीम रियाझबद्दल बोलायचे झाल्यास याने ‘बिग बॉस १३’ च्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख बनविली आहे. तो घरी असतानाच त्याच्या फॅन फॉलोविंग मध्ये खूप जास्त वाढ झाली.स्वत: बिग बॉसनेही शो दरम्यान सांगितले होते की शो सुरू होण्याच्या अवघ्या ५ तास आधी असीमला स्पर्धक म्हणून निवडले गेले होते. यानंतरही असीम रियाझ हा ‘बिग बॉस १३’ चा पहिला उपविजेता ठरला. याआधी तो वरुण धवनसोबत ‘मैं तेरा हीरो’ चित्रपटातही दिसला आहे.

 

Leave a Comment