महिला, मुलींवर अत्याचार कमी करण्यासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
महिलांच्या सुरक्षेसाठी, कराटे खेळाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देणे यावेत. कराटे हा खेळ उत्तम आहे. खेळामुळे आरोग्य निरोगी व चांगले राहते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी केले. साकुर्डी (ता. कराड) येथे अशोकराज चॅरिटेबल ट्र्रस्ट, वेदांत फिटनेस सेंटर व कराटे प्रशिक्षक अर्जुन कळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वसंरक्षण मोफत कराटे प्रशिक्षण आणि कराटे स्पर्धा या उपक्रमाचा दशकपूर्ती सोहळा आयोजित केला होता. यावेळी नामदार शंभूराज देसाई बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराज उद्योग समुहाचे शरद चव्हाण हे होते. यावेळी प्रकाश पाटील, लक्ष्मण देसाई, वेदांत फिटनेस सेंटरचे नवनाथ पालेकर, अशोकराज नागरी सह. पतसंस्थेचे संचालक विश्वास कणसे, सुनील निकम, सुनील बामणे, सचिन पवार, संदीप सावंत, गणेश पाटील, संदीप साळुंखे, उपसरपंच अशोक माने, अनिकेत शिंदे, विकास डोंगरे, युवा उद्योजक शुभम चव्हाण, माजी कृषी अधिकारी सुरेंद्र शिंदे, श्रद्धा स्पोर्ट्सचे प्रशिक्षक अर्जुन कळंबे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने असे उपक्रम महत्त्वाचे आहेत. या उपक्रमाची व्याप्ती वाढावी, यादृष्टीने सर्वोत्तोपरी मी शासन दरबारी प्रयत्न करेन. पुढची पिढी सक्षम होण्यासाठी व महिला, मुलीवर अत्याचार कमी करण्यासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे आहे. यावेळी कराटे स्पर्धेत सहभागी मुला मुलींचा चषक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद चव्हाण यांनी केले. अर्जुन कंळबे यांनी आभार मानले.