घराणेशाहिच्या मुद्द्यावरून खवळली करीना ; म्हणाली मग स्टार किड्स चे चित्रपट पाहूच नका

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा वाद पेटून उठला आहे. सुशांतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा दावा अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनिही केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांनी बॉलीवूडमधील स्टारकिड्सवर निशाणा साधला. अशातच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की ‘मग तुम्ही स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका.

नुकताच करीनाने मोजो न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला घराणेशाही आणि स्टारकिड्स यांच्याशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.कोणाला स्टार बनवायचं ते प्रेक्षकच हे ठरवतात. जर तुम्हाला स्टार किड्सपासून इतक्या समस्या आहेत तर मग त्यांचे चित्रपट पाहायला जाऊ नका असे करीना बोलताना दिसत आहे. या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

लोकांनी सोशल मीडियावर करीनाचा आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ बॉयकोट करण्याची मागणी केली.आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असणारा लालसिंग चड्ढा हा चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here