Karmaveer Bhaurao Patil : ‘कर्मवीरायण’मधून उलघडणार ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाची गाथा; ‘हा’ अभिनेता साकारतोय भाऊरावांची भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Karmaveer Bhaurao Patil) मराठी सिनेविश्वात कायम अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांवर आधारलेले बायोपिक सिनेमे येत असतात. यामध्ये आता आणखी एका बायोपिक सिनेमाची भर पडणार आहे. महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.

कर्मवीरांच्या भूमिकेत कोण झळकणार? (Karmaveer Bhaurao Patil)

मराठी कलाविश्वात प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम हे या सिनेमात कर्मवीरांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. आतापर्यंत अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट येत्या १७ मे २०२४ पासून महाराष्ट्रात सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.

या चित्रपटाची निर्मिती ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा.लि. यांनी केली असून प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर यांनी केली आहे. (Karmaveer Bhaurao Patil) तर धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि अनिल सपकाळ व धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. योगेश कोळी यांचे छायाचित्रण केले असून संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

कलाकारांची मांदियाळी

या चित्रपटात किशोर कदम यांच्यासह सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. कर्मवीरांविषयी बोलायचं झालं तर, लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. (Karmaveer Bhaurao Patil) यामुळे शिक्षणाचं महत्त्व ओळखून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती.

मात्र प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे, असा त्यांचा ठाम विचार होता. त्यामुळे वंचितांच्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क द्यायला हवा असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून त्या काळी लोकांचा विरोध पत्करून त्यांनी शिक्षणाचा प्रसार सुरु केला. विरोधाला ज जुमानता त्यांनी शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच ठेवलं. त्यांनी विविध शिक्षण संस्थादेखील उभारल्या. (Karmaveer Bhaurao Patil) शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळले आणि त्यामुळे ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव पुढे कर्मवीर झाले. अशा शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा हा जीवनपट आता प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.