छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना ही छोटी गोष्ट; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. अशात आता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि छोटी गोष्ट आहे, असे वादग्रस्त विधान बोम्मई यांनी केले आहे.

बंगळुरुमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार झाल्यानंतर आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रणरागिणीनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. अशात आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणे हि छोटी गोष्ट आहे. अशा छोट्या गोष्टीसाठी दगडफेक करणे, शांतता भंग करणे हे चुकीचे आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता आणखी शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता आहे. बंगळुरुतील घटनेमुळे कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झालेले असून कोल्हापूरमधील पुणे बंगळुरु महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरमध्ये कर्नाटकाच्या वाहनांना काळे फासणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

Leave a Comment