बसवराज बोम्मई तत्काळ माफी मागा; वादग्रस्त विधाना प्रकरणी एकनाथ खडसेंची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी आता शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारचे प्रमुख जर असे म्हणत असतील की ही छोटी गोष्ट आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माफी मागावी, अशी मागणी मंत्री शिंदे यांनी केली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, कर्नाटक मधील बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणारी घटना घडली असून हि अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे देशभरातील अस्मितेला धक्का पोहोचला आहे. आणि अशात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की ही छोटी गोष्ट आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारचे प्रमुख जर असे म्हणत असतील की ही छोटी गोष्ट आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तत्काळ माफी मागावी.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. अशात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि छोटी गोष्ट आहे, असे वादग्रस्त विधान केले असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्रातील नेत्यांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे.

Leave a Comment