कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांची राजीनाम्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आज दुपारी राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेटही घेतली होती. अखेर आता त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर आज येडियुरप्पांनी व्यासपीठावरून राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं येडियुरप्पा म्हणाले. ‘माझ्यावर कर्नाटकच्या जनतेचं ऋण आहे. जनतेचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही, हे मी आमदार आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो असे येडियुरप्पा यांनी म्हंटल.