अरे देवा ! नवरीची साडी न आवडल्यामुळे मोडले लग्न, नवरा मंडपातून पळून गेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नवऱ्याच्या आई वडिलांना होणाऱ्या नवरीची साडी पसंत न पडल्यामुळे लग्न मोडल्याची अजब घटना कर्नाटकात घडली आहे. जेव्हा ही बातमी नवऱ्याला कळाली तेव्हा नवरा मंडप सोडून  पळून गेला. या प्रकरणातील मुलगा आणि मुलीचे आधीपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या या विवाहाला कुटुंबीयांचीही परवानगी होती.

कर्नाटकातील हासन जिल्ह्यात ही घटना घडली. हसनचे एसपी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, बीएन रघुकुमार आणि संगीता गेल्या एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्याची शपथ घेतली. जेव्हा दोघांनी आपल्या पालकांशी लग्न करण्याविषयी बोलले तेव्हा त्यांनी त्यांची संमतीही दिली. बुधवारी लग्नाच्या विधी पार पडत असताना संगीताची साडी पाहिल्यानंतर रघुकुमारच्या आई-वडिलांना राग आला. वधूची साडी निकृष्ट दर्जाची असल्याचा त्याने आरोप केला.

यानंतर त्यांनी संगीताला साडी बदलण्यास सांगितले. ही छोटी गोष्ट वादाच कारण ठरली आणि दोन्ही बाजूंमध्ये वादविवाद झाला. यानंतर रघुकुमारचे आई-वडील संतापले आणि लग्न मोडण्याविषयी बोलले. हे ऐकताच नियोजित वर रघुकुमार तेथून निघून गेला. त्यानंतर रघुकुमार यांनी काहीही उघड केले नाही. पोलिसांनी रघुकुमारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment