बेंगलोर | कर्नाटक मधे सध्या कॉग्रेस आणि जनता दल आघाडीचे सरकार सत्तेत आहे. कॉग्रेस आणि जनता दलाचे मंत्रिपद न मिळलेले नाराज आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. सरकार महामंडळाच्या नेमणुका करत नसल्याने आम्ही राजीनाम्याचे हत्यार उपसणार आहोत असे एका आमदाराने खाजगीत म्हणले आहे. सरकार म्हणून काम करणारे आमच्याच पक्षाचे नेते आम्हाला भाव देत नसल्याची खंत या आमदारांच्या मनात आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय आघाड्या बनत आहेत. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या आमदारांचा राजीनामा देण्याचा डाव आहे जेणेकरून सरकार अल्पमतात जाईल.
२२४ च्या कर्नाटक विधानसभेत कॉग्रेस जनता दल आघाडीला १५५ जागा होत्या. कुमारस्वामिनीं एका जागेचा राजीनामा दिला आहे तर एका आमदाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. १७ आमदारांनी राजीनामा दिल्यास आघाडीचे संख्याबळ ९६ वर घसरणार आहे. अशाने सरकार अल्पमतात येणार आहे. असे झाल्यास भाजप सत्तेवर दावा सांगू शकतो कारण भाजपचे संख्याबळ १०४ आहे. या बातमीने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते नाराज १७ आमदार कोण याचा तपास कॉग्रेस जनता दल आघाडी लावत आहे.