‘या’ कारणामुळे कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये रविवारी रात्री हि धक्कादायक घटना घडली आहे. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. मृत हर्षावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या शिमोगामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षा हा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता.हर्षाच्या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हर्षाने हिजाब विरोधी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. यादरम्यान हर्षाच्या हत्येमुळे शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली.

नेमकं काय घडलं?
बजरंग दलाच्या 26 वर्षीय कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर हर्षाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हा हल्ला कोणी केला हे अजून समजू शकलेले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हिजाब वादाची पार्श्वभूमी
कर्नाटकात हिजाबवरुन वाद सुरु झाल्यापासून बजरंग दलाने सक्रिय भूमिका बजावली आहे. या हत्येनंतर अनेक चर्चाना उधाण आले आहे. काही जण या हत्येला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या हल्ल्याबाबत पोलिसांकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु आहे.

Leave a Comment