हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा ‘लव आज काल 2’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही दोन वेगवेगळ्या काळातील रोमँटिक कथा असून या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन जोरात या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये तो सारा अली खानला हाताने घास भरवत असल्याचे दिसत आहे. कार्तिक आणि साराचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या गमतीशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत.
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा हा फोटो ‘लव्ह आज कल’ च्या शूटिंग दरम्यानचाअसल्याचं सांगितल जात आहे. हा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले की ‘काफी दुबली हो गई हो, आओ पहले जैसी सेहत बनाएं.’ कार्तिक आणि साराचा हा फोटो जवळपास 19 लाख वेळा पाहिला गेला आहे. असो, ‘लव आज कल’ मध्ये सारा आणि कार्तिकची जोडी चांगलीच पसंत केली जात आहे.
सारा अली खान बद्दल बोलायचे झाल्यास तिचा ‘कुली नंबर वन’ हा चित्रपट तिच्या ‘लव्ह आज काल’ नंतर रिलीज होईल आणि त्यानंतर ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ मध्ये दिसणार आहे. इतकेच नाही तर कार्तिक आर्यनही सध्याला जोरदार लाइनअप मध्ये आहे. कार्तिक आर्यन आता ‘भूलभुलैया 2’ आणि टीसीरीजच्या पुढील अॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहेत. अशा प्रकारे, लवकरच दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांना त्यांच्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.