पान मसाल्याची जाहिरात करण्यास Kartik Aaryan चा नकार, इतक्या कोटींची होती ऑफर !!!

Kartik Aaryan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बहुरंगी अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला बॉलिवूड अभिनेता Kartik Aaryan सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याच्या ‘भूल भुलैया 2’ ला चित्रपट देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. आता कार्तिकच्या चाहत्यांना त्याच्या ‘शेहजादा’ या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. नुकतेच Kartik Aaryan ने एक मोठे पाऊल उचलले आहे. तर हे जाणून घ्या कि, कार्तिकने नुकतेच पान मसाल्याच्या जाहिरातीची 9 कोटींची ऑफर नाकारल्याची बातमी समोर आली आहे.

Kartik Aaryan Top Sellers, 57% OFF | www.ipecal.edu.mx

बॉलीवूड हंगामाममधील एका बातमीनुसार, पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर येताच Kartik Aaryan ने ती करण्यास नकार दिला. एका अॅड गुरूच्या माध्यमातून या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, ही गोष्ट अगदी खरी आहे. कार्तिककडे एका अशा जाहिरातीची ऑफर आली होती. मात्र त्याने लगेचच 9 कोटींची ही ऑफर नाकारली.

Shehzada makers deny Kartik Aaryan threatened to exit film- Cinema express

दरम्यान सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी Kartik Aaryan चे कौतुक केले आहे. याबाबत ते म्हणाले की,” पान मसाल्याची जाहिरात करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि कायद्याने सेन्सॉर बोर्डालाही तसे करण्यास मनाई आहे.” हे लक्षात घ्या कि, याआधी अक्षय कुमार देखील एका पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसून आला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोलही करण्यात आले. यानंतर त्याला लोकांची माफी देखील मागावी लागली.

akshay kumar, akshay kumar post

यावेळी अक्षयने एक पोस्ट करत म्हंटले की, ‘मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची, माझ्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मात्र, मी कधीही तंबाखूचा प्रचार केला नाही आणि करणार नाही. विमल इलायची यांच्या असोसिएशन बाबत तुमच्या प्रतिक्रिया काहीही असोत, मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मिळालेली फी मी एका चांगल्या कारणासाठी वापरेन.’ Kartik Aaryan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Kartik_Aaryan

हे पण वाचा :

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!