करुणा मुंडेंनी नव्या पक्षाची केली स्थापना; पक्षाला दिले ‘हे’ नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या वर खळबळ आरोप केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव असणार असून हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली.

काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. तसेच नगरमध्ये ३० जानेवारीला मोठा मेळावा घेऊन पक्षाच्या कामाची सुरुवात करणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचेही त्यांनी बोलून दाखवल.