तालिबानने काश्मीरप्रश्नी घेतलेल्या ‘या’ भूमिकेमुळे पाकिस्तानला झटका ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तालिबानने नुकतेच जाहीर केले आहे की,’ यापुढे काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये (पाकिस्तान पुरस्कृत) अजिबात सहभागी होणार नाही. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही.’ काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सध्याला सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. मात्र तालिबानने हे सर्व दावे सोमवारी फेटाळून लावले आहेत. तालिबानने अशी भूमिका घेणे हा पाकिस्तानसाठी एक मोठा झटका असल्याचे म्हंटले जात आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तान या दोहोंमध्ये अनेक वर्षांपासून मैत्रीचे चांगले संबंध आहेत. अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी तालिबानचा वापर पाकिस्तानने नेहमीच केलेला आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचे अधिकृत वृत्त दिले आहे.

“तालिबान आता काश्मीरमधल्या जिहादमध्ये सहभागी होणार, हे मीडियामध्ये आलेली बातमी निराधार आणि चुकीची आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही” असे सुहैल शाहीन याने सांगितले. तो अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता आहे.

‘जोपर्यंत काश्मीर वादावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत भारताशी मैत्री होऊ शकत नाही’ असे तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीदने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर काश्मीरसंबंधी मोठया प्रमाणावर पोस्ट व्हयरल होत असल्याचे सोशल मीडिया मॉनिटर करणाऱ्या टीमच्या लक्षात आले. त्या पार्श्वभूमीवर आता तालिबानच्या प्रवक्त्यानेच या वृत्ताचे खंडन केले आहे.

Taliban official says group spoke with US official - Kashmir Pen

मीडियामध्ये प्रसिद्ध झालेलं हे वृत्त आणि त्यामुळे सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा यामुळे तालिबानची भारताबद्दलची भूमिका बदलली आहे का? हे जाणून घेण्यात आले. त्यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर तालिबानकडून अधिकृतपणे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काबूल आणि दिल्लीतील राजनैतिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे . सोशल मीडियावरील पोस्ट या फेक असून तालिबानने अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही असे स्पष्ट करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment