Kawasaki Z650RS 2024 : Kawasaki ने भारतात लाँच केली नवी बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Kawasaki Z650RS 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kawasaki Z650RS 2024 : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki ने भारतात आपली नवी बाईक लाँच केली आहे. Kawasaki Z650RS असे या बाइकचे नाव असून ही बाईक हिरव्या आणि लाल रंगात उपलब्ध असेल. 649cc दमदार इंजिन असलेल्या या बाइकमध्ये कंपनीने बरेच अपडेटेड फीचर्स दिले आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात…

गाडीच्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, या अपडेटेड 2024 Kawasaki Z650RS चा लूक आणि डिझाईन सध्याच्या मॉडेलसारखीच आहे. बाईकच्या समोरील बाजूला गोल LED हेडलाइट तुम्हाला पाहायला मिळेल. याशिवाय बाईक मध्ये देण्यात आलेली स्लिम इंधन टाकी आणि स्टबी टेल-सेक्शन गाडीला आणखी आकर्षक बनवतो. तसेच या बाईकमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि सस्पेंशनसाठी मागील बाजूस मोनोशॉक युनिट देण्यात आले आहे.

इंजिन – Kawasaki Z650RS 2024

Kawasaki Z650RS 2024 मध्ये 649cc, लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून 68bhp पॉवर आणि 64Nm टॉर्क जनरेट करते. या रेट्रो बाईक मध्ये 2 ट्रॅक्शन कंट्रोल मोड आहेत. यातील पहिला म्हणजे स्पोर्ट मोड आहे, जो बाईक स्पोर्टी पद्धतीने चालवण्याची परवानगी देतो. आणि दुसरा सेफ्टी मोड आहे, जो अपघात रोखण्यासाठी उपयुक्त आहे.

अन्य फीचर्स –

गाडीच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक्स, ड्युअल-चॅनल एबीएस, 17-इंच चाके आणि एलसीडी स्क्रीनसह ट्विन-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी खास वैशिष्ट्ये मिळतात. कंपनीने या बाईकची (Kawasaki Z650RS 2024 ) सुरुवातीची किंमत 6.99 लाख रुपये ठेवली आहे.