कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत ६० कोटींची कामे मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज तब्बल ६० कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती स्थायी समितीचे मावळते सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. इतक्या मोठ्या रकमेची कामं एकाच दिवशी आणि एकच सभेत मंजूर झाल्यानं कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांची सभापतीपदाची टर्म संपली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आजची शेवटची स्थायी सभा होती. आता पुढे पुन्हा सभापती निवडणूक होणार असल्यानं महिनाभर स्थायी समितीची सभा होऊ शकणार नाही. त्यामुळं आज घाईघाईनं सर्व प्रलंबित विषयांना मंजुरी देण्यात आली. यात पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि अन्य विषयांच्या तब्बल ६० कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. मावळत्या सभापतींनी जाता जाता सगळ्या फायली क्लीअर केल्याची चर्चा यानंतर महापालिकेत रंगली होती.

Leave a Comment