चंदेरी दुनिया । बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांची आज जयंती. राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 ला पेशावरमध्ये झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर भारतात आले. त्यांनी नाटकांची विशेष आवड होती.
त्यांनी अभिनय क्षेत्रात चांगलं यश संपादन केलं. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनया क्षेत्रात आलेला त्यांचा मुलगा राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला.
राज कपूर आणि दिग्दर्शक केदार शर्मा यांच्यात एक अतूट नातं होतं. राज कपूर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात असिस्टंट म्हणून केदार शर्मांसोबत काम करत असत. एकदा क्लॅप देताना चूक झाल्यानं केदार यांनी सर्वांसमोर राज कपूर यांच्या कानशीलात लगावली. त्यावेळी राज यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचे डोळे पाहिल्यावर केदार शर्मांना आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याचा पुढचा सिनेमा ‘नीलकमल’साठी राज यांना नायकाच्या भूमिकेसाठी कास्ट केलं.