दिग्दर्शक केदार शिंदेंच्या हातात पुन्हा पडली लग्नबेडी; फोटो झाले वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेले नाव म्हणजे केदार शिंदे. एक प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अश्या अनेक भूमिका वाजविणारे केदार खऱ्या खुऱ्या आयुष्यातील भूमिका देखील तितक्याच जबाब्दारीनिशी पार पडत असतात. नुकतेच देशातील विविध मुद्द्यांवर परखड आणि स्पष्ट मत व्यक्त करण्याच्या अंदाजामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा केदार त्यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो वायरल होत असल्यामुळे चर्चेत आले आहेत. हो.. दुसरे लग्न.. पण आपल्याच पत्नीसोबत. तब्बल पंचवीस वर्षांच्या सुखी संसारानंतर हे कपाळ दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकले आहे. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहेत.

https://www.facebook.com/vasundhara.sable.3/posts/2909916665887983

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतेच लग्नाच्या २५ व्या वाढदिवसादिवशी पत्नी बेलासोबत पुन्हा लग्न केले आहे. हा सोहळा ९ मे २०२१ रोजी घरगुती पार पडला. यावेळी अंकुश चौधरी, शर्मन जोशी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या कलाकारांनी विशेष उपस्थिती दर्शविली होती. यांच्या व्यतिरिक्त सोहळ्याला मराठी आणि हिंदी कलाकारांनी व्हिडीओ कॉलद्वारे हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याबद्दल वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

https://www.instagram.com/p/COpL7mGpAtI/?utm_source=ig_web_copy_link

केदार शिंदे आणि बेला शिंदे यांचा प्रेम विवाह होता. त्यात घरच्यांची परवानगी नसल्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते. यामुळे पहिल्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नव्हता. या लग्नात लॉकडाउ असल्यामुळे बेला शिंदेंचे आई वडिल येऊ शकले नाहीत. पण कन्यादान मात्र पार पडले. या लग्न सोहळ्यात त्यांचे कन्यादान आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी मिळून केले. तसेच या लग्नाबद्दल केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची लेक सना शिंदे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, आई-बाबांचा कधी साखरपुडा झाला नव्हता. हळदीचा कार्यक्रम पार पडला नव्हता, एकत्र राहण्यासाठीची वचन घेण्यासाठी त्यांनी मुहूर्त पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना ही स्पेशल भेट द्यायचे ठरविले. लग्नसोहळा नाही तर लग्न महत्त्वाचे असते हे पटवून देण्यासाठी आई-बाबा तुमचे आभार.

Leave a Comment