हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ यात्रेला (Kedarnath Yatra) आजपासून सुरुवात झाली आहे. आज, शुक्रवारी, सकाळी ७ वाजता, केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिराचे दरवाजे उघडताच संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले. यावेळी हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उत्तराखंडमधील प्रसिद्ध चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट देण्यासाठी दरवर्षी लोक लांबून येतात आणि शंभो महादेवाचे दर्शन घेत असतात. भाविकांसाठी हा क्षण आनंदाचा आणि आस्थेचा असतो..
केदारनाथचे दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी संपूर्ण मंदिर १०८ क्विंटल फुलांनी आणि हारांनी सजवण्यात आले होते. सरकार, प्रशासन आणि पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांसह, सुरक्षा दल देखील त्यावेळी तैनात होते. तत्पूर्वी गुरुवारी बाबा केदार यांची पंचमुखी चाल विग्रह उत्सव डोली केदारनाथ धाममध्ये पोहोचली होती. १५ हजारांहून अधिक भाविक बाबांच्या दर्शनासाठी आधीच पोहोचले होते आणि गुरुवारी सकाळी दरवाजे उघडताच संपूर्ण धाम ‘हर-हर महादेव’ आणि ‘बम-बम भोले’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला.. संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला.. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री धामी यांनी यावेळी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी संवाद साधला.
#WATCH | Uttarakhand CM Pushkar Singh Dhami arrives at Shri Kedarnath Dham ahead of the portals' opening of the dham pic.twitter.com/zn7wFaI8XR
— ANI (@ANI) May 2, 2025
हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थान- Kedarnath Yatra
दरम्यान, केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. केदारनाथला जाण्यासाठी (Kedarnath Yatra) तुम्ही दिल्ली किंवा कोणत्याही शहरातून हरिद्वार किंवा डेहराडूनला ट्रेन, बस किंवा फ्लाइट घेऊ शकता. दिल्ली ते केदारनाथ हे अंतर अंदाजे ४६६ किलोमीटर आहे.