‘हा भारतमातेचा विजय आहे, लव्ह यू दिल्ली’ – अरविंद केजरीवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य “आप’च्या झोळीत घसघशीत मतं टाकली. त्यामुळे ‘आप’नं भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवत मोठा विजय संपादन केला आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्तेची चावी सोपविली आहे.

शाहीन बाग, नागरिकत्व सुधारणा कायदा या मुद्द्यांमुळे या निवडणुकीला राजकीय अर्थाने वेगळंच महत्व प्राप्त झालं होतं. अरविंद केजरीवाल यांनी मात्र शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि दिल्लीचा विकास या मुद्द्यांभोवतीच ही निवडणूक केंद्रित केली होती. आम आदमी पक्ष्याच्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी दिमाखदार यश मिळवलं. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी, अमाणतुल्ला खान यांचा समावेश आहे. खान यांनी शाहीनबागमधून तब्बल ७० हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला.

निकाल लागल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. लव्ह यू दिल्ली म्हणत त्यांनी हा विजय भारतमातेचा आणि दिल्लीकरांचा असल्याचं सांगितलं. याशिवाय प्रशांत किशोर, शरद पवार, उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांनीही केजरीवाल यांचं अभिनंदन केलं.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment