हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आज आहे. या निघालामध्ये यंदा सलग दुसऱ्यांदा पिनराई विजयन यांच्या भक्कम नेतृत्वाखाली एलडीएफला आघाडी मिळाली आहे. या निकालामध्ये विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्यांनी गेल्या चार दशकांमध्ये केला नाही असा कारनामा विजयन यांनी करून दाखवला आहे. या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या कामाला जनतेने पसंतीची पावती दिल्याचे मतदान निकालांमध्ये दिसून येत आहे.
केरळ विधानसभामध्ये 140 जागा आहेत. यामध्ये एलडीएफ 73 जागांवर आघाडीवर असून, केरळमध्ये पुन्हा कमुनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार बनेल असे चित्र स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार डावी लोकशाही आघाडी हे 73 जगांसहित आघाडीवर असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला हे 43 जागांवर आघाडीवर आहे. सोबतच भारतीय जनता पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहे.
केरळची जनता दीर्घकाळापासून डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस महाआघाडीच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला आलटून-पालटून सत्ता सोपवत असल्याचे दिसून आले आहे. परंतु यंदा सलग दुसऱ्यांदा पिनराई विजयन यांच्या भक्कम नेतृत्वाखाली त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे. यामुळे, हे एक प्रकारचे रेकॉर्डच विजयन यांनी केरळमध्ये बनवले आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी करोना काळामध्ये केलेल्या विशेष कामाला जनतेने पसंती दिल्याचे दिसून येत आहे.