कराड | भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडून केरळ येथील तिरूअनंतपूर ते गुजरात मधील केवाडिया असे 2 हजार 45 किलोमीटर अंतराच्या एकता रॅलीचे कराड येथे स्वागत करण्यात आले आहे. आज दि. 16 रोजी कराड येथे ही सायकल रॅली 18 व्या दिवशी पोहचली आहे.
एकता रॅलीचे कराड येथे स्वागत प्रांताधिकारी उत्तम दिघे, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले. यावेळी इन्स्पेक्टर नंदलाल चित्ते, डेप्युटी कमांडर के. पाँल वायफे, हेडकॉन्स्टेबल सुरेश भिंताडे, राजू रेडेकर आदी उपस्थित होते.
या सायकल रॅलीमध्ये 40 जवानांचा समावेश आहे. राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. CSIF जवानांनी काढलेली ही रॅली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकास अभिवादन करून सांगता होईल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रॅली 30 आॅक्टोबर रोजी गुजरातमध्ये केवाडीया येथे पोहोचेल.