अल्पवयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी TikTok स्टारला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

केरळ : वृत्तसंस्था – केरळमधील थ्रिसूरमध्ये 19 वर्षीय टिकटॉक स्टारला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. या टिकटॉक स्टारला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. बलात्कार झाल्यानंतर हि अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचे नाव अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असे आहे. अंबिलीवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री झाली होती. यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री झाल्यामुळे हे दोघे एकमेकांना भेटू लागले. या भेटीदरम्यान विघ्नेशने मुलीला लग्नाचे वचन दिले. त्यानंतर तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा विघ्नेशला समजले कि मुलगी गर्भवती राहिली तेव्हा तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याची माहिती मिळताच विघ्नेश फरार झाला आहे. पोलिस सध्या विघ्नेशचा शोध घेत आहेत.

विघ्नेशचा तपास करत असताना पोलिसांना समजले कि,विघ्नेशने पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्याचा परदेशात पळून जाण्याचा प्लान होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक शक्कल लढवली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितले कि,विघ्नेशनचा पासपोर्ट तयार आहे. त्यानंतर ही माहिती देण्यासाठी शनिवारी त्याचे वडील जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांचा पाठलाग केला आणि विघ्नेश कृष्णाला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment