केरळसाठी कायपण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

केरळ पुरग्रस्तांसाठी पाकिस्तानचा आणि एसटी महामंडळाचा मदतीचा हात

पाकिस्तान, महाराष्ट्र व केरळ |अमित येवले

सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या वतीने आम्ही केरळवासीयांसाठी प्रार्थना करीत आहोत. भारताला याप्रसंगी लागेल ती मदत मानवतेच्या भावनेने करायला आम्ही तयार असल्याचं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलं. शांततापूर्ण सहकार्यासाठी पाकिस्तानने उचललेलं हे पाऊल कौतुकाचा विषय होत आहे. दरम्यान केरळमधील पूरस्थिती नियंत्रणात येत असून सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ येत आहे.

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तसेच महामंडळ पुढे सरसावले आहे. महामंडळाने १० कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द केला.
आपातकालीन परिस्थितीमध्ये अनेक वेळा स्वतःवर संकटे ओढवून अविरतपणे सेवा देणाऱ्या महाराष्ट्र एसटीने अशा वेळी सामाजिक भान वापरून देशातील एका राज्यावर आलेल्या संकटावेळी मदत केली आहे.

व्यक्ती व त्यांच्या अडचणी सध्या महत्वाच्या आहेत, त्यामुळे शक्य त्या सर्व मार्गांनी मदत आपण केली पाहिजे. आपण सर्वांनी खुल्या मनाने सोबत येऊन पुढं जायला हवं अस मत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केलं.

Leave a Comment