हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ketaki Chitale On Marathi Language । सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलावेच लागेल, अशी भूमिका मनसे, ठाकरे गट आणि इतर काही पक्षांनी घेतली आहे. मात्र आता यात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेतली आहे. फक्त उडीच घेतली नाही तर वादग्रस्त विधान करत पुन्हा एकदा टीकाकारांना आमंत्रण दिले आहे. मराठी बोललो नाही तर भोकं पडणार आहेत का? असं म्हणत केतकी चितळे हिने अकलेचे तारे तोडले आहेत. तिच्या या विधानानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
केतकी चितळे नेमकं काय म्हणाली? Ketaki Chitale On Marathi Language
सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट करत केतकी चितळेने मराठीबाबत वादग्रस्त विधाने (Ketaki Chitale On Marathi Language) केली आहे. तसेच ठाकरे कुटुंबावरही आगपाखड केली आहे. लोकमराठीच्या वादातून आपली असुरक्षितता दर्शवत आहेत. ‘फक्त मराठीत बोल’ किंवा ‘तुला मराठी कसं येत नाही’ असा दबाव टाकला जात आहे. समोरची व्यक्ती मराठी बोलेल की नाही, याने मराठी भाषेचे नुकसान होणार आहे का? मराठी न बोलल्याने कोणाला भोकं पडणार आहेत का? अशा दबावातून तुम्ही फक्त स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. यामुळे कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, असं केतकीने म्हंटल.
ती पुढे म्हणाली, अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषा ही स्वतंत्र असली पाहिजे, अन्य भाषेवर आधारित असू नये, अशी अट होती. मात्र मराठी, बंगाली आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ही अट २०२४ मध्ये काढून टाकण्यात आली. आता अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना देऊन टाका असं माझं वैयक्तिक मत आहे. Ketaki Chitale On Marathi Language
ठाकरे कुटुंबावर टीका-
यावेळी केतकी चितळेने ठाकरे कुटुंबियांवरही टीका केली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू स्कॉटिश मिशनरी ख्रिस्चन कॅथलिक स्कुल मध्ये शिकले ते चालते आणि तुम्ही सगळ्यांपुढे ज्ञान पाजळता कि मराठी बोलणे अनिवार्य आणि गरजेचं आहे.. आणि दुसरीकडे स्वतःची मुले मिशनरी शाळेत शिकतात. सामना वृत्तपत्रही स्वतःचे नाव बदलणार का? राज ठाकरे सामना हे नाव बदलायला लावणार का? कारण सामना हा पारसी शब्द आहे असं म्हणत केतकी चितळे हिने ठाकरेंना लक्ष्य केलं.