धक्कादायक ! सिने अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाने पुण्यात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (akshay mategaonkar) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत अक्षय (akshay mategaonkar) हा संगणक अभियंता होता. नोकरी न लागण्याच्या भीतीने आणि अपेक्षांच्या ओझ्याने त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अक्षयने (akshay mategaonkar) आत्महत्या करण्याअगोदर एक सुसाईड नोटासुद्धा लिहीली आहे. या सुसाईड नोटमध्ये ‘मी सर्वांची माफी मागतो. मला माफ करा. हे माझे कदाचित शेवटचे बोलणे आहे, असे चिठ्ठीत त्याने लिहिले आहे. मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे असे लिहिले आहे. अक्षय हा सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिचा तो चुलत भाऊ होता.

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये ?
माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वांची मी माफी मागतो. तुमच्या कोणाच्याच अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा. मी खूप प्रयत्न केला, मेहनत घेतली. मात्र त्यात मला अपयश आले. इंटर्नशीप चांगली व्हावी, यासाठी मी खूप मेहनत घेतली, मात्र ती खराब झाली. त्यामुळे मला प्लेसमेंट नाही मिळाली. हे सर्व तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. आई, बाबा आणि आकांक्षा, आय अ‍ॅम सॉरी… आय क्विट, लिहित त्याने (akshay mategaonkar) आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

पहाटेच्या सुमारास घडली घटना
पहाटेच्या सुमारास अक्षयने (akshay mategaonkar) आत्महत्या केली आहे. घरातील परिस्थिती चांगली असताना, सधन कुटुंबाची पार्श्वभूमी असताना अक्षयने अशाप्रकारचे टोकाचे पाऊल उचलल्याने दु:खासह आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment