Keto Diet Plan | कीटो डाएट प्लॅन म्हणजे काय ? जाणून घ्या या डाएटचे फायदे

Keto Diet Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Keto Diet Plan | आज काल माणसांची जीवनशैली खूप बदलली आहे. धकाधकीचे आयुष्य, अस्वस्थ जीवनशैली त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे त्यांच्या आरोग्य बिघडत चाललेले आहे. परंतु या सगळ्यावर मात करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा अवलंब करतात. जिममध्ये जातात योगासन करतात, जॉगिंग, पोहणे, ध्यान करणे यांसारख्या गोष्टी करतात. त्याचप्रमाणे आपल्या आहाराचे देखील काळजी घेत असतात. लोक आता वेगवेगळ्या प्रकारच्या आहार घेतात. त्यातीलच एक म्हणजे डायट प्लॅन म्हणजे किटो डायट प्लॅन. (Keto Diet Plan) आजकाल बरेच लोक हा डाएट प्लॅन फॉलो करत असतात.

कीटो डायट प्लॅन (Keto Diet Plan) हा पीसीओएसची लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांमधील हा हार्मोनल आजार आहे. त्याचा परिणाम स्त्रियांवर होतो. या आजारापासून आराम मिळण्यासाठी महिला कीटो डायट प्लॅन फॉलो करतात. आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कीटो डायट प्लॅन म्हणजे काय ?

सध्याच्या लोकप्रिय आहारांपैकी एक आहे. त्याला केटोजनिक आहार असे देखील म्हणतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक या डायट फॉलो करतात. या डायट प्लॅनमध्ये कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि चरबीयुक्त अन्नपदार्थ खाल्ले जातात. एक प्रकारे हा उच्च चरबीयुक्त आहार आहे. आता आपण त्याची त्याचे फायदे जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यास उपयुक्त | Keto Diet Plan

हा आहार वजन कमी करण्यास मदत करतो. हा आहार चयापचय वाढवते आणि भूक देखील कमी लागते. यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी खायला दिल्या जातात. ज्यामुळे भूक कमी होते आणि तुमची पोट भरल्यासारखे वाटते म्हणजेच त्यात एक भूक कमी करणारे हार्मोन वाढवतात.

हृदय निरोगी ठेवते

या डाएट प्लॅनमध्ये (Keto Diet Plan) ॲव्होकॅडो वगैरे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि आपल्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळे आपले हृदय निरोगी राहते आणि आपणही निरोगी राहतो.

पिंपल्सची समस्या दूर करते

आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अनेक कारणांमुळे होतात. काही लोकांसाठी हे अस्वास्थ्यकर आहारामुळे होते आणि इतरांसाठी हे रक्तातील साखरेची पातळी राखत नसल्यामुळे होते. अशा परिस्थितीत केटो डाएट प्लॅन फॉलो करून आतापर्यंत अनेकांना मुरुमांपासून आराम मिळाला आहे.