KGF स्टार यशने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । दाक्षिणात्य सुपरस्टार यशने नुकताच त्याच्या मुलीचा आयराचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. १ डिसेंबरला आयरा एक वर्षांची झाली. विशेष म्हणजे आयराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यश आणि त्याची पत्नी राधिका पंडितने मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. बंगळूरू येथील या पार्टीची थीम डिजनीलँड होती.

यशच्या मुलीच्या पार्टीत अनेक नावाजलेले कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. बाहुबली सिनेमाचे निर्माचे शोभु यायलागाड्डासह अनेक कलाकारांनी या पार्टीला आवर्जुन उपस्थिती लावली होती. आयरा तिच्या वाढदिवसाला फार क्युट दिसत होती. आयराचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
कन्नड सिनेमांचा सुपरस्टार यशने या वर्षी केजीएफ सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. या सिनेमाने फक्त कन्नड बॉक्स ऑफिसवरच नाही तर हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. शाहरुख खानचा झिरो आणि रणवीर सिंगचा सिंबा हे दोन्ही सिनेमे याच काळात प्रदर्शित झाला होता. पण प्रेक्षकांनी केजीएफ सिनेमालाच अधिक पसंती दिली होती.
सिनेमाच्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी याचा दुसरा भाग काढण्याचाही निर्णय घेतला. सध्या केजीएफ २ सिनेमाच्या कथेवर काम सुरू आहे. विशेष म्हणजे सिनेमाच्या सिक्वलमध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त असणार आहे. संजू बाबाच्या वाढदिवसालाच याची घोषणा करण्यात आली होती. सध्या केजीएफ २ सिनेमाचं चित्रीकरण सुरू असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अजूनपर्यंत निश्चित करण्यात आलेली नाही.