कोरोना लसीकरणात खंडाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड |

कोरोना लसीकरण मोहीम खंडाळा येथे आरोग्य विभागाकडून राबत असताना विशेष खबरदारी घेतली जाते आहे. नाव नोंदणी करण्यापासून ते लस टोचण्यापर्यंत शिवाय पुढील खबरदारी कशी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण विभागाकडून याबाबतची अधिक माहिती लसीकरण आधीकरी शलाका ननावरे आणि लसीकरण अधिकारी स्मिता आरडे यांनी दिलेली आहे.

१६ जानेवारी पासून या मोहिमेला सुरुवात होत असताना शंभर लोकांची ऑनलाइन यादी आली होती. पहिल्याच दिवशी ७५ टक्के यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले होते. २८ फेब्रुवारी अखेर ११०५ पुरुष आणि १५२५ स्त्रिया असे मिळून एकूण २६३० इतक्या लाभार्थ्यांनी कोरोना लस घेतलेली आहे. दररोज जास्तीत जास्त लोक लस घेत आहेत. लस घेतल्या नंतर ३०मिनिटे लाभा र्थ्यांना निरिक्षणासाठी थांबावे लागते. १३ फेब्रुवारी रोजी सर्वात जास्त म्हणजे २३४ शिक्षकांचे लसीकरण नोंदले गेले आहे.कोविड लसीकरण प्रक्रियेमध्ये खंडाळा तालुका हा जिल्ह्यात अव्वल गणला जात आहे.या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. रवींद्र कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोकरे, डॉ.गुरव, हे आहेत. कोरोना लसीकरण यशस्वी करण्यासाठी दोन विभागातून कामकाज पाहिले जाते आहे. लसीकरण अधिकारी शलाका ननावरे आणि लसीकरण अधिकारी स्मिता आरडे प्रतीक्षा जाधव व रेश्मा नेवसे सुवर्णा जाधव अन् शिवाजी नांदेडकर डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या माध्यमातून हे दोन विभाग सांभाळले जात असून दररोज नाव नोंदणी ची सुरुवात श्री पांडुरंग धायगुडे,फिरोज सय्यद अमोल कोरडे ,संतोष माने लसीकरण प्रक्रिया पार पाडत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment