घरात राहू, कोरोनाशी लढू | कोरोना रोग केवढा भयंकर आहे हे तुम्ही आम्ही रोज टिव्हीवर बघतोय. त्यांवर लस नहीये, पण सोशल distancing पाळून त्याचा संसर्ग आपण रोखू शकतो एवढं तरी आपल्याले समजलंय. आपल्या गावाकडले अनेक तरुण पोरपोरी पुण्या मुंबईत रहायले आहेत.
शिक्षण, नोकरी, उद्योगधंद्यानिमित्त ते तिकडे राहाताय. कोरोना च्या भीतीनं आता ते स्वतःच्या गावाले परत येलहेत. तर तेंनी हे समजून घेतलं पाहिजे की तुम्हांला जर स्वतःची, स्वतःच्या घरादाराची अन गावाच्या लोकांची चिंता आशिन तर पुढचे काही दिवस घरातच थांबा. तुम्ही गावाले सुट्टी मनव्याले, पार्ट्या कऱ्याले, कट्ट्यावर बसून गप्पा कऱ्याले नही येल.
डॉक्टर असं सांगता की तरुण पोरपोरिंमध्ये आजाराची लक्षणं दिसत नहीत, अन ते मात बी करता रोगावर. तुम्ही तरून हे, अजूनतुमची immunity पॉवर जरा बरिये, तेच्यामुळे तुमच्यात कोरोना ची लक्षणं दिसणार भी नहीत, आनि तुम्हाले हा आजार व्हयल भी असला तरी तुम्ही बरे होऊन जासान. पण तुमच्यामुळे तुमचे मायबाप गावतले लोकं ह्या आजाराला बळी पडतीन. हे समजून घ्या.
गावातल्या लोकांनीही त्यांच्याशी नीट वागलं पाहिजेल. असं समोर येतंय की बाहेरून आलेल्या पोरापोरींकडे गावचे लोक संशयाच्या नजरेने पाह्याले लागलेय. येच्यामुळे तेंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.
त तायांनो अन भावांनो घरात रहा. स्वतःले वाचावा, स्वतःच्या कुटुंबाले वाचावा, गाव वाचवा, देश वाचवा