खटावचे तहसिलदार किरण जमदाडे शेतकऱ्यांच्या बांधावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

तडवळे ता. खटाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पिकाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तहसिलदारांच्या या कामाच्या पध्दतीमुळे शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या चार दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात अवकाळीने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खटाव तालुक्यातील हाताशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शासकीय यंत्रणेकडून पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्याच्यातून केली जात होती. अशावेळी तहसिलदार किरण जमदाडे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तहसिलदारांच्या या कार्यपध्दतीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी तडवळे गावचे सरपंच डॉ. प्रकाश पाटोळे, गणपतराव खाडे, बाळासो पवार, मालन साबळे, अलका पळे, रूपाली खाडे, पी. डी. पाटोळे, पोलीस पाटील संदीप खाडे, अमोल साबळे व ग्रामसेवक सचिन सस्ते याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment