रसिकांसाठी खयाल-ए- खय्यामचे आयोजन

औरंगाबाद | गेल्या वर्षी पासून संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर रसिकांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर यावे तसेच अडचणीतील कलावंतांना उमेद मिळावी या हेतूने 26 जून रोजी खयाल-ए-खय्यामचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या 26 जूनला औरंगाबादेत ‘महक’ तर्फे गायिका मनीषा निश्चल आणि सहकाराचा सुरेल कार्यक्रम होणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असून रसिकांसाठी हा कार्यक्रम विनाशुल्क असणार आहे. कोरोना महामारीमुळे नाट्यगृह चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर कार्यक्रमसुद्धा बंद ठेवण्यात आले होते. यामुळे ऑर्केस्ट्रा, कार्यक्रम, लोककला यावर पोट असलेल्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्याचबरोबर जाहीर कार्यक्रम, मैफली, नाटक पाहण्या पासून रसिक प्रेक्षक वंचित राहिले होते.

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तरी सुद्धा नाट्यगृहात जाऊन कार्यक्रमाची आनंद घेण्याची इच्छा असून सुद्धा प्रेक्षक संभ्रमात आहे. अशा स्थितीमध्ये या प्रेक्षकांना विश्वास देण्यासाठी आणि कलावंतांना उमेद देण्याची गरज आहे. याच हेतूने 26 जूनला हा कार्यक्रम ‘महक’ च्या माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमात मनीषा निश्चल यांच्या सोबत गफार मोमीन, अजय राव, पृथ्वीराज हे कलावंत मैफल सादर करणार आहेत. त्यांना या मैफिलीत राजेश तायडे, अजय तायडे, सचिन वाघमारे, अमर वानखेडे, जितेंद्र साळवे, विनोद वाहुळ आणि जीवन कुलकर्णी हे वादक साथ देणार आहेत.

You might also like