हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ च्या विजेत्यांची नुकतीच घोषणा केली आहे. त्यानुसार, ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) , जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश(Gukesh Dommaraju) , पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांना यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) प्रदान करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रपतींकडून सर्व खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामासुब्रमणियम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावे करण्यात आली आहेत. ज्यांनी २०२४ मध्ये क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली.
महत्वाचे म्हणजे, यंदा क्रीडा क्षेत्रात भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश, कांस्यपदक विजेता हरमनप्रीत सिंग, नेमबाज मनू भाकर चर्चेचा विषय बनले. आता या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात येत आहे.