खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात! 2 ठार तर 35 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खोपोली : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे (accident) प्रमाण वाढत चालले आहे. खंडाळा घाटात अशाच एका विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी वेट एँण्ड जॉयला सहलीला गेले होते. या बघतात मृत पावलेल्यांमध्ये १ मुलगा आणि १ मुलगी यांचा समावेश आहे. मृत पावलेल्या मुलीचे नाव हितिका खन्ना तर मृत मुलाचे नाव राज म्हात्रे आहे.

या बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते, यातले 35 जण जखमी तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. या अपघातातील (accident) काही जखमींना खोपोलीला तर काहींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस पूर्ण क्षमतेने भरलेली होती. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढण्यात आलं.

या भीषण अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू केलं. या अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधील सर्व विद्यार्थी मुंबईतील चेंबूर भागातील एका कोचिंग क्लासमध्ये शिकतात. हे सर्व लोक सहलीसाठी खोपोलीत आले होते.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या